मराठीतून शपथ घेत राज्यपाल रमेश बैस यांनी स्वीकारला पदभार
मुंबई महाराष्ट्र नवे राज्यपाल यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ रमेश बैस हे महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
२ ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेल्या रमेस बैस यांनी वाजपेयी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. रमेश बैस हे सात वेळा खासदार राहिलेले आहेत रमेश बैस यांनी छत्तीसगढ मधील रायपूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व केलेले आहे. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत निवडून आले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. १९८० पासून १९८४ पर्यंत ते मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. १९८९ मध्ये तेव्हाच्या एकत्रित मध्य प्रदेश छत्तीसगढ च्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार बनले. त्यानंतर सलग सात वेळा त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. लालकृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्तीय आहेत.रमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल होते. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपालपदही सांभाळले आहे.