२१ फेब्रुवारीपासून बारावी बोर्डाची परीक्षा, परीक्षा केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी बैठकीचे नियोजन.
एरंडोल :- तालुक्यातील डी डी एस पी महाविद्यालयात केंद्र क्रमांक ७९० . बारावी बोर्डाची परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी प्रारंभ होत आहे. कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी केंद्रप्रमुख आर एस पाटील , व्ही एस वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या केंद्रावर एकूण १३०७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये तालुक्यातील ६ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दि.२१ फेब्रुवारी इंग्रजी विषयापासून प्रारंभ होत असून विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था खालील प्रमाणे.
(१) डी डी एस पी महाविद्यालय (जुनी इमारत )म्हसावद नाका
१२ विज्ञान: एस 066609 ते एस 066835,
१२ कला;एस 126337ते एस 126712,
(२) डी डी एस पी महाविद्यालयाचे
आय टी आय नवीन इमारत
एम एस सी बी सब स्टेशन समोर
१२ कला
एस 126713 ते एस 126746
१२ वाणिज्य
एस 155680 ते एस 155883
१२ किमान कौशल्य विभाग
एस 161345 ते एस 161419
(३) रा.ति. काबरे विद्यालय एरंडोल
१२ विज्ञान
एस 066836 ते एस 067281
वरील प्रमाणे बैठक व्यवस्था केंद्रातर्फे करण्यात आलेली आहे, विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० वा आपला नंबर ज्या ठिकाणी असेल त्या केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन केंद्रप्रमुख आर एस पाटील, प्राचार्य एन ए पाटील यांनी केले आहे.