कासोदा येथील लिटिल व्हॅली स्कूल चे मावळ्यांनी बनवलेला सटेलाईट झेपावला आकाशात…
कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी)
आमचा शेतकरी कष्टकरी पालकांच्या मुलांनी आणि लिटिल व्हॅली स्कूल ने आणि सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालुन दिलेला आदर्श आज सार्थ ठरवला
तमिळनाडू राज्यातील कांचीपुरम जिल्हातून पत्तीपुलम गावातून आकाशात प्रस्थान
संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेष करून उत्तर महाराष्ट्र साठी खुप महत्त्वाची तेवढीच गर्वाची गोष्ट अशी की पद्मालय तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेला एरंडोल तालुक्याच्या कुशीत वसलेले कासोदा हे टुमदार गाव आता आपण गर्वाने गुगल फेस बुक ट्विटर लिंकडीन आणि सोबतच यूट्यूब ला पण बघायला मिळणार आहे
गौरवाची बाब अशी की लिट्ल व्हॅली स्कूल चे विद्यार्थी हर्ष पाटिल वेदांत मोरे कुणाल तडवी वेदांत शिणकर मयुरेश पाटिल विकास बारेला अंकेश पाडवी हर्षदा पाटिल मोनाली पाटिल मानसी सुर्यावशी अमृता दडगव्हाड स्वाती वारे रुचिका पाटिल असे ऐकुन 13 विद्यार्थांनी डॉ एपिजे अब्दुल कलाम सटेलाईट लाँच वेईकल मिशन 2023 अतर्गत आणि डॉ एपिजे कलाम INTERNATIONAL FOUNDATION च्या उपक्रमातून आणि त्याचे स्वप्नपूर्ती साठी हा प्रकल्प राबवित आहे
ह्या प्रकल्प अतर्गत आपल्या लीटल व्हॅली स्कूल चे विद्यार्थी यांनी सर्वांनी मिळून एक पिको उपग्रह बनवला आहे त्याचे वैशिष्ट साफ्टवेअर आणि हार्डवेअर घटकाच्या इन ऑर्बिट चाचण्या किफायतशीर आपण ह्या सटेलाईट द्वारे करू शकतो
तसेच जगाला आणि भारताला सुद्धा लिटिल व्हॅली स्कूल आणि कासोदा ह्या गावाची दखल ह्या विद्यार्थ्यांनी घेयाला भाग पाडलं आहे
सहभागी प्रत्येक विद्या्थ्यास खालील प्रशिस्तपत्रे देण्यात आले
१) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड
२) आशिया बुक ऑफ रेकॉर्ड
३) इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड
४) अस्सिस्ट रेकॉर्ड
५) एकेआयएफ
ह्या सटेलाईट लॉन्चिंग चे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवर दाखवण्यात आले
तसेच पालक वर्ग आणि पंचक्रोशीतील मंडळींना शाळेत सुद्धा थेट प्रक्षेपण पाहण्याची वेवस्था करून देण्यात आली होती पंचक्रोशीतील पालक वर्ग तसेच प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती विद्यार्थी मध्ये आणि शिक्षक मंडळी मध्ये नवचैतन्य साकारले होते संस्थेचे चेअरमन अशोक पाटील सर डायरेक्टर ललित पाटील सर मुख्याध्यापक विजय महाले सर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली