कासोद्याच्या साधना विद्यालयात गुणवत्ता वाढीसाठी बक्षीस योजना
संचालक एस.आर.पाटील यांची घोषणा
कास़ोदा-येथील साधना माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची स्पर्धा वाढवण्यासाठी यंदापासून बक्षीस योजना सुरू करण्यात आली असून शिक्षकांसाठी देखील योग्य अध्यापनासाठी आदर्श शिक्षक निवडला जाणार असल्याची घोषणा ज.जि.मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक एस.आर.पाटील यांनी ई.१० व ई. १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभात केली आहे.
यंदा परिक्षार्थी विद्यार्थी इ.१०वीत प्रथम येण्यार्याला रु.२५००/- द्वितीयला रु.१५००/- तर तृतीयला रु. ११००/-रोख बक्षीस देण्यात येऊन या विद्यार्थ्यांच्या मातेला साडी व पित्याचा रुमाल टोपी देऊन विद्यालयात बोलाऊन सन्मान करण्यात येणार आहे, तसेच उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या एका शिक्षकांची निवड करण्यात येऊन त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कार प्रदान करुन रोख रु.५०००/- देण्यात येऊन सार्वजनिक सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढावी व शिक्षकांमध्ये अध्यापनाची स्पर्धा वाढावी, यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
सूत्रसंचालन गर्विता चौधरी व वेदीका महाजन यांनी तर सुत्रसंचलन भागवत बेडसे यांनी केले,ई.१०वीचा विद्यार्थी व बालकिर्तनकार दिनेश पाटील, भागवत बेडसे, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.के.सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, आभार दिवाकर तायडे यांनी मानले,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.