एरंडोल येथे दिव्यांग बांधवांसाठी मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबीर संपन्न.
प्रतिनिधी ¬– एरंडोल येथे आज दि.२१ फेब्रु.२०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नाने ई.डी.पी. योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटपासाठी एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांसाठी मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमेश परदेशी हे होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन एरंडोल तहशिलदार सुचिता चव्हाण,गटविकास अधिकारी दादाजी जाधव,भाजपा तालुकध्यक्ष ऋषिकेश पाटील,माजी उपनगराध्यक्ष नितीन महाजन,मा.सरपंच राजेंद्र पाटील,वैद्यकीय अधीक्षक कैलास पाटील, सिविल सर्जन मुकेश चौधरी तसेच ५०० ते ६०० अपंग बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्या सर्वांची वैद्यकिय तपासणी करून त्यांना लागणाऱ्या साहित्या संबंधी योग्य मार्गदर्शन करण्यात आले आणि साहित्य वाटप लवकरच करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रम यशस्वितेसाठी निलेश परदेशी,पिंटू राजपूत,अमर राजपूत, विवेक ठाकूर,एड.मधुकर देशमुख,कल्पेश महाजन आदींनी परिश्रम घेतले.