धरणगाव चौफुली उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे – माजी आमदार डॉ.सतीष पाटील.
प्रतिनिधी – एरंडोल येथील धरणगाव चौफुली वर बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे अशी मागणी धरणगाव चौफुलीवर बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाच्या खाली शिव छत्रपती मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिव जयंती प्रसंगी माजी आमदार डॉ.सतीष पाटील यांनी केली तसेच १६ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या शिंदे गटाला दिलेल्या निर्णयाला काळा दिवस असल्याचे प्रतिपादन त्यांनी करत आमदार चिमणराव पाटील यांचे नाव न घेता व शिंदे सरकारच्या आमदारांचे नाव न घेता शिवाजी महाराजांचे मावळे गद्दार असते तर महाराज छत्रपती झाले नसल्याचे सांगितले.
राजेंद्र शिंदे, नगरसेविका वर्षा शिंदे यांचेतर्फे शिवजयंती, देखावा सादर करण्यात आला होता यावेळी अनेकांनी शिवरायांना वंदन केले. समाजबांधवांसह सर्वसमावेश मिरवणूकीसाठी पोलिस बंदोबस्त चोख होता.कार्यक़्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन रविंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. आर. एस. पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी राकेश पाटील सर यांचेस स्वप्निल सावंत, पंकज पाटील, अजय पाटील, राज पाटील, शरद पाटील, हेमंत पाटील, गोटू पाटील आदींनी परिश्रम घेतले.