एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.
राजे संभाजी पाटील समाज मंडळ.
प्रतिनिधी – एरंडोल कोरोनाकाळात बंद असलेली शिवजयंती यंदा मात्र कोरोना नसल्यामुळे प्रचंड उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात एरंडोल शहरासह परिसरात, तालूक्यात साजरी करण्यात आली. मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ (शिवतिर्थ) राजे संभाजी पाटील समाज मंडळातर्फे संपन्न झाला. उपस्थित प्रमुख मान्यवरांसह शिवप्रेमींनी शिवरायांचे पुजन करून वंदन करण्यात आले. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. ए. पी. देशमुख होते.
व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक देविदास महाजन, पो. नि. ज्ञानेश्वर जाधव, नायब तहसिलदार दिलीप पाटील, पोलिस अधिकारी गणेश अहिरे, शरद बागल, निवृत्त तहसिलदार अरूण माळी, माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, शिवसेना ज्येष्ठ नेते रमेश महाजन, राजू चौधरी, विजय महाजन, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, आनंदा चौधरी, महाविद्यालय अध्यक्ष अमित पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव,माजी नगरसेवक प्रा. मनोज पाटील, माजी नगरसेवक बबलू चौधरी, सामजिक कार्यकर्ते गजानन पाटील, डॉ. उमेश पाटील, डॉ. फरहाज बोहरी,माजी नगरसेवक अभिजीत पाटील, चिंतामण पाटील, डॉ. राजेंद्र देसले, प्रा. किशोर वाघ, समाज अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपप्राचार्य आर. एस. पाटील, उद्योजक समाधान पाटील, डॉ. भूषण पाटील, डॉ. प्रशांत पाटील, शेखर पाटील, सुभाष पाटील, दुर्गादास पाल्लीवाल, के. डी. बापू पाटील,डॉ. किरण पाटील, प्रमोद पाटील, शिवाजी पाटील, पत्रकार कमरअली सैय्यद, नितीन पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी जगदीश ठाकूर, देविदास महाजन, विजय महाजन, आनंदा चौधरी, अॅड. देशमुख, अरूण महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
सायंकाळी सजविलेल्या पांढर्या शुभ्र घोड्यांच्या बग्गीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषात जिवंत देखावा आकर्षण ठरले. शहरातून वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. अनेक ठिकाणी पुजा, ओवाळणी करण्यात आली तसेच वारीकरींनी नागरीकांचे लक्ष वेधले.
शास्त्री इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी
एरंडोल येथील शास्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये १९ फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला यावेळी शास्त्री फाऊंडेशन चे अध्यक्ष व प्राचार्य डॉ विजय शास्त्री आणि सेक्रेटरी रूपा शास्त्री हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.पराग कुलकर्णी होते. सर्व प्रथम मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अजिंक्य जोशी यांनी केले तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थी प्रतिनिधी राहुल निळे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी महाराजांना मानवंदना दिली व शिवचरित्र कथाकथन, पोवाडा गायन, कविता व नाटक असे विविध कार्यक्रम महाविद्यालयात सादर केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा सुनील पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा जावेद शेख, प्रा सतीश ब्राह्मणे, प्रा करण पावरा कॉलेजचे जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.