न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मराठी राज भाषा गौरव दिवस संपन्न
प्रतिनिधी – ए.शि.प्र.मं.संचलीत न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये २७ फेब्रुवारी रोजी नामवंत लेखक वि. वा. शिरवाडकर यांची जयंती व मराठी राजभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमा प्रासंगी प्रथम शाळेच्या वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत शाळेच्या आवरात छत्रपती शिवाजी महाराज व मावळे याची मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत निर्भय शिंपी व मावळे रणवीर पवार समर्थ हे विद्यार्थी होते .नंतर शाळेच्या प्रिसींपल सौ. सरला विंचूरकर व व्हाईस प्रिसींपल सरीता पाटील यांच्या हसते माता सरस्वती व वि वा शिरवाडकर याच्या प्रतीमांचे पूजन करण्यात आले नंतर शाळेतील वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी मी मराठी या गाण्यावर समूह नृत्य सादर केले तर दामीणी या पाचवीच्या विद्यार्थीनीने लावणी नृत्य सादर केले या विद्यार्थ्यांना नृत्य मार्गदर्शन करिश्मा मँडम व उज्वला धनगर यांनी केले .तसेच तनुश्री पाटील, राजश्री जोगी या विद्यार्थ्यांनींनी मनोगत व्यक्त केले तर शाळेच्या प्रिन्सिपल सरला विचुंरकर , व्हाईस प्रिन्सिपल सरीता पाटील , उप शिक्षक कविता पाटील, सिमा शिंदे, उज्वला धनगर, पि डी बोरसे यांनी मराठी कविता सादर केल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी डी बोरसे व आभार सौ. उज्वला धनगर यांनी केले या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते शाळेच्या मराठी विभागाने या कार्यक्रमाची पूर्ण तयारी केली होती