रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे ‘या’ व्यक्तीला पडले महागात; Viral Video पाहून तुम्हालाही धक्का बसेल
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे अगदी खरेखुरे असतात. तर काही व्हिडीओ हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी बनवले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या लोभामुळे असं काही घडतं जे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील.
https://twitter.com/i/status/1630105980062277632
व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, एक मजूर रस्त्याने चालताना दिसत आहे. तितक्यात त्याला रस्त्यावर पडलेले पैसे दिसले. पैसे दिसताच त्या मजुराने लालसेपोटी ते पैसे उचलले. खरं तर हा एक प्रँक होता. जेव्हा या व्यक्तीने खाली पडलेले पैसे उचलले तेव्हा बाजूला असलेल्या गोणीतून एक साप बाहेर आला, जो या व्यक्तीच्या अंगावर आला. खरं तर हा साप खोटा होता आणि प्रँकचा भाग होता. पण तो ज्यापद्धतीने अंगावर आला ते पाहून कोणीही घाबरून जाईल. साप अंगावर आल्याने हा मजूर असा काही घाबरला की तो खाली पडला आणि इकडे तिकडे उड्या मारू लागला.