images-27.jpeg

अमळनेर : इयत्ता १० वी ची परीक्षा आज २ मार्च पासून सुरू होत आहे. तालुक्यातील ११ परीक्षा केंद्रांवर ४ हजार ६९३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. ११ बैठे पथक नेमण्यात आले आहेत.
दहावी च्या परीक्षेसाठी शहरात सानेगुरुजी विद्यालय , एन. टी. मुंदडा माध्यमिक विद्यालय आणि त्याचे उपकेंद्र सावित्रीबाई कन्या विद्यालय , जी एस हायस्कूल ,जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय , प्रताप हायस्कूल व त्याचे उपकेंद्र डी आर कन्याशाळा विद्यालय , ग्रामीण भागात मारवड , अमळगाव , कळमसरे , दहिवद , शिरूड ,वावडे आदी केंद्रांवर परीक्षा होत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रपेमुखांचे ११ बैठे पथक नेमण्यात आले आहेत. तसेच शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांचे एक पथक , तर गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांचे एक पथक असे भरारी पथके नेमण्यात आले आहेत.
परीक्षेत कॉपी करणारे आणि कॉपी पुरवणारे दोघांवर कठोर कारवाई करण्यात येईल.- विश्वासराव पाटील ,गटशिक्षणाधिकारी अमळनेर
दहावीच्या परीक्षेसाठी महसूल विभागाला अद्याप कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत.- मिलिंदकुमार वाघ , तहसीलदार ,अमळनेर

About Author

You may have missed

error: Content is protected !!