प्राचार्य डॉ. अनिल लोहर यांचा मित्र परिवारातर्फे झाला सत्कार.
प्रतिनिधी – एरंडोल येथील प्राचार्य डॉ.अनिल लोहार बाहेती कॉलेज जळगाव यांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीस महाराष्ट्र शासनाने वाढ दिल्याबद्दल आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या प्रदीर्घ, प्रेरणादायी अशा शैक्षणिक, प्रशासकीय कार्याबद्दल एरंडोल येथे मित्र परिवारातर्फे गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील होते.
यावेळी एरंडोल महाविद्याल संस्थाध्यक्ष अमित पाटील, क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटी जळगाव संचालिका उज्वला बाहेती, दिलीप लोहार, रोहन बाहेती आदींच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.
जळगाव निवासी एरंडोल समूहामार्फत सदर गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ सदस्य बी. जी. लोहार यांच्या संकल्पनेनुसार संजय बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सुरेश पांडे,माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर, अॅड. ओम त्रिवेंदी, मृदुलअहिरराव यांचेसह सदस्यांच्या सहकार्याने एरंडोल येथील हॉटेल माऊली येथे सोहळा संपन्न झाला.