एरंडोल येथील निलिमा मानुधने अहिल्याबाई होळकर वनरक्षक पुरस्काराने सन्मानित..
एरंडोल:- अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा जळगाव यांच्यातर्फे राष्ट्रीय विशेष गौरव पुरस्कार २०२२ अंतर्गत अहिल्याबाई होळकर आदर्श वनरक्षक पुरस्काराने निलिमा निलेश मानुधने यांना सन्मानित करण्यात आले.
समाजात अहिल्याबाई होळकर यांच्या वनरक्षक व वृक्ष संवर्धनाच्या मौलिक संदेशा प्रमाणे समाजसेवेची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या कार्याची दखल घेत त्यांना सदर पुरस्काराने जळगाव येथे सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्वत्र राजकीय, सामाजिक स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.