एरंडोल येथे राष्ट्रस्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत ९२६ विद्यार्थ्यांचा सहभाग
एरंडोल – येथे यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डी डी एस पी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दि.शं. पाटील यांच्या १०१ जयंतीनिमित्त चौथी राष्ट्र स्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अमित राजेंद्र पाटील हे होते म्हणून प्रभारी प्राचार्य एन. ए. पाटील उपप्राचार्य डॉ. बडगुजर, प्रा. के.जी. वाघ, प्रा. ए. टी. चिमकर, डॉ. एन. एस. तायडे हे उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तामिळनाडू, पंजाब इत्यादी राज्यांमधून ९२६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला
डॉ. एस. एम. साळुंखे यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेचा आढावा घेतला व मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक जूमनानी तानिया अमरलाल ( एम जे कॉलेज जळगाव ) ३००१/- रु. रोख, द्वितीय क्रमांक पौलबुधे तुषार कैलास (बद्रीनारायण बरवळे महाविद्यालय जालना ) २००१/- रु. रोख, तृतीय क्रमांक बागुल पुनम देवमन ( स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस जळगाव) १५०१/- रु. रोख
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. एस. एम. साळुंखे, डॉ. यु. पी. गवई, प्रा. वाय. व्ही. येंडाईत , प्रा. एस. एन. विसपुते, डॉ. एस. एल. पाटील, प्रा. एस. जी. सजगणे, प्रा. एम. आर. सिरसाठ, प्रा. आर. पी. पाटील यांनी परिश्रम घेतले.