बकऱ्या चोरी करून बाजारात विक्रीसाठी आणल्या.

images.jpeg

प्रतिनिधी जळगांव : चोरीला जाणाऱ्या घटनांना प्रचंड वाढल्यामुळे त्यात जनावरे देखील चोरीस जात असल्याच्या घटना समोर आली आहे चोरी करून आणलेल्या बकऱ्या बाजारात विक्री करताना दोन महिलांना अटक करण्यात आली बकऱ्या चोरुन
जळगावात दर शनिवारी जनावरांचा बाजार भरतो. त्यात जनावरे, विक्रीला येतात.
शनिवारी जनावरांचा बाजारात दोन महिला बकऱ्या विक्रीसाठी आल्या होत्या. पोलिस अल्ताफ पठाण, विशाल कोळी यांना चोरीच्या बकऱ्या विक्रीला आल्याची माहिती मिळाली. असल्याने त्यावरून दोघांनी बाजारात जाऊन खात्री केली असता, त्यांना बकऱ्या विक्रीसाठी आलेल्या महिलांवर संशय आला.

डशा पांडुरंग काटे व सपना रवीद्र गोंधळी या दोघी महिलांची कसून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात संपर्क केला असता, तेथे बकऱ्या चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. संशयित महिलांना बकऱ्यांसह ताब्यात घेतले असून, त्यांनी या बकर्‍या बुलढाणा जिल्ह्यातील मोताडा तालुक्यातील बोराखेडी येथून चोरी केल्याची कबुली दिली.

About Author

You may have missed

error: Content is protected !!