एरंडोलला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन…
प्रतिनिधी – राज्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वादळाचा तसेच अवकाळी पावसाचा फटका एरंडोल तालुक्याला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी वादळ व काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊन बळीराजा हवालदिल झाला आहे. गहू, हरबरा, मका या पिकांसोबत फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हि भीषण परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर सरसकट पंचनामे करून योग्य ती मदत तसेच विमा कंपन्याना नुकसान भरपाई चे आदेश द्यावेत अशा आग्रही मागणीचे निवेदन एरंडोल तालूका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदार सौ. सुचिता चव्हाण यांना देण्यात आले . तसेच महिला दिनाचे औचित्य साधून तहसीलदार सौ. चव्हाण यांचा सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, उप जिल्हासंघटक किशोर निंबाळकर, तालुकाप्रमुख रविंद्र चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, युवासेना तालुकाप्रमुख गुलाबसिंग पाटील, युवासेना शहरप्रमुख प्रमोद महाजन, सतिष पाटील, राजू पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते…