सप्तरंग इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट व स्माइलिंग स्टोन फाउंडेशन तर्फे डॉ. राहुल वाघ यांना ” खान्देश रत्न 2023 ” पुरस्कार …..
एरंडोल प्रतिनिधी :-
सप्तरंग इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट व स्माइलिंग स्टोन फाउंडेशन तर्फे रविवार दिनांक ५ मार्च, 2023 रोजी “खान्देश रत्न पुरस्कार 2023” या कार्यक्रमात . वैद्यकीय व आरोग्यसेवा अश्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना खान्देश रत्न पुरस्कार 2023 हा पुरस्कार देऊन सन्मानित केले . या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री पल्लवी पाटील (नवा गडी नवं राज्य, बसता, ट्रिपल सीट व तू तिथे असावे, फेम) व खान्देशातील अनेक नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात आरोग्यसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एरंडोल येथील डॉ. राहुल वाघ यांना खान्देश रत्न पुरस्कार 2023 या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारा बद्दल एरंडोल शहर व तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.