या अधिकार्याला सेवेतुन निलंबित करणार ! – मुख्यमंत्री
पणजी – येथे पर्यटनासाठी आलेल्या देहली येथील पर्यटक कुटुंबावर तलवार आणि चाकू यांच्या साहाय्याने आक्रमण करण्यात आले.
जीवघेण्या आक्रमणाचा गुन्हा कलम ३०७ अंतर्गत (हत्येचा प्रयत्न) नोंद करण्याऐवजी तो कलम ३२४ अंतर्गत (तीक्ष्ण हत्याराने दुखापत करणे) म्हणजे सौम्य कलमाखाली नोंद करण्यात आला. जीवघेण्या आक्रमणाची नोंद योग्य प्रकारे न घेतलेल्या पोलीस अधिकार्याला सेवेतून निलंबित करून या घटनेचे सखोल अन्वेषण केले जाणार आहे. १३ मार्च या दिवशी सायंकाळपर्यंत संबंधित अधिकारी सेवेतून निलंबित होणार आहे, अशी माहिती गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पोलीस, पर्यटन आणि कामगार खाते यांच्या संयुक्त बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर संबंधित पोलीस अधिकार्याचे अन्यत्र स्थानांतर करण्यात आले आहे.सामाजिक माध्यमातून प्रकार उघडकीस आल्यावर पोलीस खात्याने संबंधित पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात खात्यांतर्गत कारवाईला प्रारंभ केला होता. पोलिसांनी या प्रकरणी ३ संशयितांना, तर एका संशयिताला कह्यात घेतले. या प्रकरणी अजूनही अटक होण्याची शक्यता आहे. घटनेविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले,पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांनी कायदा हातात न घेता याविषयी पोलिसांना माहिती देवी व कायद्याचे पालन करावे.