Video: ‘दो घुंट’ गाण्यावर मुंबई लोकल ट्रेनमध्ये वृद्धांची धमाल, नेटकरी म्हणतात हेच मुंबईकरांचं स्पिरीट
मुबई लोकल म्हणजे मुंबईकरांसाठी जणू दुसरं घरच. दिवसभरातील अर्धावेळ प्रवासात जातो. लोकल म्हणजे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपास वसलेल्या शहरवासीयांसाठी लाइफलाइनच आहे. मुंबई लोकलमधून रोज हजारो लोक प्रवास करतात. यावेळी कित्येक अनोळखी चेहरे हे एकमेकांचे घट्ट मित्र होतात आणि नव्याने मैत्रीचा प्रवास सुरु होतो. ऑफिसमधला सगळा थकवा लोकलमध्ये गप्पा मारत, गाणी गात घालवला जातो. मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर पाहिले जातात. या मुंबई लोकलमधील दुनियाच काही औरच आहे. या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला याचा अनुभव येतो. दरम्यान असाच काही प्रवाशांचा गाणं गातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/Cp7nhnQI_4l/?utm_source=ig_web_copy_link
या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रवासादरम्यान काही मुंबईकर बॉलीवूडच्या ‘दो घुंट मुझे भी पिला दे शराबी’ या हिट गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी काही वृद्ध व्यक्तीही तरुणांसोबत नाचताना दिसत आहेत. यामध्ये एक वृद्ध आजोबा वयाचं बंधन झुगारुन गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत तर एक काका या गाण्याला म्युझिक देण्यासाठी चक्क लोकल डब्याच्या खिडकीजवळील पत्रा वाजवत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच खूश व्हाल.