एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू .

n48262248816794557757029708d3d7793ad7b5719344d427e813c2b15489b6ef79c1046f5f89fb48758913.jpg

बीड – एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला. शेतात पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या हौदात बुडून बीडच्या सावळेशवर पैठण इथे खेळता खेळता पाण्याच्या हौदात उतरलेल्या तिघांनाही पोहता येत नसल्याने ही दुर्घटना घडली असावी असं म्हटलं जात आहे.तिन्ही मुलं ही चुलत भावंडं असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्वराज जयराम चौधरी पार्थ श्रीराम चौधरी आणि कानिफनाथ गणेश चौधरी या तिघांचा शेतातील पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू झाला. तिघांच्याही आई ज्वारी काढण्यासाठी शेतात गेल्या होत्या. तेव्हा दुपारी तिघांनाही शेतातल्या झाडाखाली थांबायला सांगितलं होतं.

मात्र पाण्याच्या हौदाजवळ खेळताना एक जण ६ फूट खोल हौदात पडला. त्याला बाहेर काढायला दोघे पाण्यात उतरले असल्याचं सांगण्यात येतंय. तिघांनाही पोहता येत नसल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या मदतीने बालकांचे मृतदेह हौदबाहेर काढले. बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!