या महिलेने आपल्यावर बलात्कार केल्याचं या तरुणाचं म्हणणं..

images-4.jpeg

गुजरातमधील एका तरुणाने बालकल्याण समितीकडे धाव घेत एका महिलेविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या महिलेने आपल्यावर बलात्कार केल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. आपण 16 वर्षांचे असताना या महिलेने आपल्यावर बलात्कार केल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे.आपल्यात आणि या महिलेमध्ये 5 वर्षांचे अंतर आहे. 16 वर्षांचा असताना ही तरुणी 21 वर्षांची होती. ही तरुणी आपल्याला हॉटेलमध्ये न्यायची आणि बलात्कार करायची असं या तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे. तू सज्ञान झाल्यावर आपण लग्न करू असं आश्वासन या तरुणीने दिलं होतं. लग्नाचं आश्वासन देत या तरुणीने आपल्याकडून पैसेही उकळल्याचं या तरूणाचं म्हणणं आहे. ही तरुणी अन्य एका व्यक्तीशी लग्न करून मोकळी झाल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे.

तक्रारदार तरूण आता 22 वर्षांचा झाला असून त्याने या तरुणीवर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तरुणाच्या तक्रारीनंतर बालकल्याण समितीने पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. तक्रारदार तरुणाचे म्हणणे आहे की त्याची आणि या तरुणीची ओळख 2015 साली एका कार्यक्रमात झाली होती. गुजरातमधल्या एका गावातील कौटुंबिक कार्यक्रमात हे दोघे भेटले होते. यावेळी महिलेने तक्रारदार तरुणाचा मोबाईल नंबर घेतला होता. यावेळी तक्रारदाराने आपण अल्पवयीन असल्याचे सांगितले. यावर या तरुणीने मी तू सज्ञान होईपर्यंत वाट पाहीन असं आश्वासन दिलं हतं. यानंतर या तरुणीने अनेकदा हॉटेलमध्ये खोली बुक करून या तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!