गांधी विचार संस्कार परीक्षेत देशमुख महाविद्यालयाच्या निशांतचे यश …
प्रतिनिधी भडगांव अनिल महाजन – जळगांव येथील गांधी फाउंडेशन, जैन हिल्स,यांच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या 'गांधी विचार संस्कार परीक्षेत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष विज्ञान वर्गाचा विद्यार्थी निशांत अशोक ततार याने घवघवीत यश संपादन केले. जळगाव जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करत निशांतने रौप्यपदक पटकावले. या यशाबद्दल निशांतला भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या परीक्षेत महाविद्यालयातून एकूण 65 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. महाविद्यालयात दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या सात वर्षांपासून महाविद्यालयाचे विद्यार्थी या परीक्षेत पदकांची कमाई करत आहेत.
गांधी विचार संस्कार परीक्षा समन्वयक म्हणून डॉ. सचिन हडोळतीकर यांनी काम पाहिले. निशांत ततार याच्या यशाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख, दत्तात्रय पवार, विनय जकातदार, विजय देशपांडे, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.