पाढंरथ विकास सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलचा १३ पैकी १२ जागांवर विजय

IMG-20230323-WA0020.jpg

अनिल महाजन प्रतिनिधी भडगांव -तालुक्यातील पांढरे येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलने परीवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत 13 पैकी 12 जागांवर विजय मिळवून एकतर्फी विजय संपादन केला. विजयी शेतकरी पॅनलच्या उमेदवारांचा आमदार कीशोर पाटील यांनी सत्कार केला.
पाढंरथ विकास सोसायटीची निवडणूक तालुक्यात चर्चेची ठरली होती. चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत परीवर्तन पॅनलचा सुपडा साफ करत शेतकरी पॅनलने विजय मिळवला. शेतकरी पॅनलचे नेतृत्व वसंत पाटील, नारायण पाटील, रघुनाथ पाटील, जगन्नाथ पाटील, प्रताप पाटील, दिलीप पाटील, विलास पाटील , लक्ष्मण पाटील, देविदास पाटील आदिनी केले. शेतकरी पॅनलचे विजयी उमेदवार असे सर्वसाधारण प्रवर्गातून योगेश सुभाष पाटील, वसंत आत्माराम पाटील, गणपत बंकट पाटील, ज्ञानेश्वर धनराज पाटील, पंडित विनायक पाटील, भैय्यासाहेब निंबा पाटील, पिरन भिवसन पाटील, दीपक सुभाष पाटील हे विजय झाले. तर महिला प्रर्वगातून लिलाबाई एकनाथ पाटील प्रमिलाबाई मधुकर पाटील या विजय झाल्या. इतर मागास प्रवर्गातून नंदलाल बळीराम पाटील यांनी विजय संपादन केला. अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातून नाना दिनकर खैरे हे विजय झाले. दरम्यान शेतकरी पॅनलच्या विजयी उमेदवाराचा आमदार किशोर पाटील यांनी सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, युवराज पाटील, डाॅ.प्रमोद पाटील आदि उपस्थीत होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!