पोपटामुळे मृत मालकिणीला ९ वर्षांनी मिळाला न्याय! दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

n4834420301679672495950cd2d876da54fd4f12e50ed830d790f5b717105ee02d3d82fab7cfbc2227f534e.jpg

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एका महिलेची ती घरी एकटी असताना चोरीच्या उद्देश्याने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात महिलेच्या पाळीव कुत्र्याला देखील संपविण्यात आले होते.मालका मुलासोबत एका लग्नात गेले होते, घरी परतले तर त्यांची पत्नी आणि कुत्रा निपचित पडले होते. या प्रकरणात आता नऊ वर्षांनी दिल्ली सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. पण खटला कसा उभा राहीला हे मोठे मनोरंजक आहे.

20 फेब्रुवारी 2014 रोजी आग्राच्या रहिवासी विजय शर्मा आपल्या मुला सोबत फिरोजाबाद येथे एका लग्नासाठी गेले होते. जेव्हा रात्री उशीरा ते घरी परतले तर त्यांची पत्नी नीलम हीचा देह निपचित पडला होता. समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांचा पाळीव कूत्रा देखील शेजारीच मृतावस्थेत पडला होता. त्यानंतर त्यांनी पोलीसांनी कळविले. पोलीसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला.

पोस्टमोर्टेममध्ये महिलेच्या शरीरावर 14 वार झाले होते. तर कुत्र्यावर 9 वार करण्यात आले होते. पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत होती परंतू कोणताही धागा सापडत नव्हता. पोलीसांनी सांगितले की, घटनास्थळाची पाहणी करताना पिंजऱ्यातील पोपट काही तरी बोलत होता. त्याच्या त्या कर्कश्य आवाजात माग पोलीसांनी घेतला. आणि पोलीसांना संशय आला की हा नेमके काय बोलत आहे. ज्यावेळी त्यांनी नीट ऐकले तेव्हा तो.. ‘आशु आया था’..’आशु आया था’, असे पोलीसांना सांगत होता. ज्यावेळी या आशु कोण आहे याचा धाडोंळा घेतला सर्व प्रकरणाचा उलगडा होत गेला.पोलिसांनी आशु याचा शोध घेतला असता त्याने सुरूवातीला काही ताकास सूर लावू दिला नाही, परंतू पोलीसांनी जेव्हा चौदावे रत्न दाखविले तेव्हा तो सूता सारखा सरळ झाला. आणि बोलू लागला. आशुतोष हा मालकीण नीलम याचा भाचाच असल्याचे उघडकीस आले. आशुतोष आणि रॉनी यांनी मिळून नीलम यांना दागिन्यांसाठी संपविल्याचे उघडकीस आले.

मालक विजय शर्मा यांनी पोलीसांना पोपट नेमके काय बोलत आहे ते सांगितले. पोलिसांनी देखील या पोपटाशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विजय शर्मा यांनी देखील पोपटाची भाषा नीट विशद करून पोलीसांना सांगितली. त्यानंतर आशुतोष आणि रॉनीला पकडण्यात आले.

कोर्टाने उपलब्ध पुराव्यानूसार भाचा आशुतोष आणि रॉनी यांना जन्मठेप सुनावली. सरकारी पक्षाचे महेंद्र दीक्षित यांना सांगितले की विशेष सत्र न्यायाधीशांना आरोपी आशुतोष गोस्वामी आणि रॉनी मॅसी या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

About Author

You may have missed

error: Content is protected !!