जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती …
अनिल महाजन प्रतिनिधी | भडगाव – दि.२४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे अवचित्य साधून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भडगाव येथे क्षयरोग दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. त्यात वैद्यकिय अधिकारी काजगाव तथा चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत पाटील यांनी क्षयरोगा बाबत मार्गदर्शन केले . त्या प्रसंगी संशयित कसा शोधायचा, त्याला काय माहिती द्यायची त्याला आपुलकीने वागून सर्व औषधोचार कसा करावा .
क्षय रोग बाबत जनजागृती महत्वाची आहे . आदी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वरिष्ठ औषधी उपचार पर्यवेक्षक श्री मिलिंद धुळे यांनी निक्षेय पोषण आहार योजनेबाबत माहिती दिली. तर संशयित रुग्ण कसा शोधायचा याबाबत डॉक्टर अभिजीत पाटील यांनी माहिती दिली . प्रसंगी भडगाव शहरातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकउपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी बीसीएम श्रीमती सुरेखा धनगर यांनी आभार व्यक्त केले.