प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या! हॉटेलमध्ये घेतला गळफास
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने रविवारी सारनाथमधील हॉटेलमध्ये आत्महत्या केली. बॉलिवूड रिपोर्टनिसार, आकांक्षा चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीला गेली होती.
यापूर्वी शनिवारी रात्री अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याचबरोबर अभिनेत्रीने याआधी अनेक मोठ्या भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येनंतर काही तासांनी अभिनेत्रीचे शेवटचे गाणे रिलीज करण्यात आले. ‘ये आरा कभी हरा नहीं’ असे या गाण्याचे शीर्षक आहे.
या गाण्याचा व्हिडिओ पवन सिंग आणि आकांक्षा यांच्यावर शूट करण्यात आला आहे. गाण्याचे बोल जावेद अख्तर आणि इमामुद्दीन यांचे असून संगीत प्रियांशू सिंग यांनी दिले आहे.आकांक्षाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस सखोल तपस करत आहेत