पद्मालय येथील गणपती  मंदीर देवस्थानास  “ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त : राज्यस्तरीय समितीची मान्यता !
  ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात पद्मालय, तरसोद गणपती मंदिर व कानळदा येथील कण्वऋषी आश्रमास “ब”  वर्ग दर्जा प्राप्त

IMG-20230114-WA0156.jpg

एरंडोल प्रतिनिधी  – जिल्ह्याच्यादृष्टीने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या पद्मालय देवस्थानाचा तीर्थस्थळाच्या ‘ब’ तिर्थक्षेत्र म्हणून दर्जा द्यावा यासाठी भाविकांसह परिसरातील नागरीकांची मागणी होती. याची दाखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार त्या- त्या- कार्यकाळातील जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर. अभिजित राऊत, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शासनाकडे ‘ब’ तिर्थक्षेत्र म्हणून दर्जा वाढ मिळण्यासाठी वेळो – वेळी  प्रस्ताव सादर केले होते.  पालकमंत्री गुलाबराव पाटील आ.चिमणराव पाटील यांनी प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापित राज्यस्तरीय समितीकडे पत्रव्यवहार करून सतत पाठपुरावा करून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली होती.त्यानुसार पद्मालय येथील गणपती  मंदीर देवस्थानास  “ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्तसाठी  राज्यस्तरीय समितीची मान्यता मिळाली आहे. मंजुरी मिळताच येथील देवस्थानचे पदाधिकारी व विश्वस्त यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाळा श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी विश्वस्त अशोक पाटील, डॉ.पिंगळे , कोळी भाऊसाहेब उपस्थित होते.

श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी (अमोद आणि प्रमोद) विराजमान आहेत. खान्देशासह महाराष्ट्राभरातून भाविकभक्त याठिकाणी श्रद्धेने येत असतात. शासनाने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत जिल्ह्याच्यादृष्टीने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या पद्मालय देवस्थानाचा विकास तीर्थस्थळाच्या ‘ब’ दर्जा द्यावा यासाठी भाविकांसह परिसरातील नागरीकांची मागणी होती. त्याची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या १-२ वर्षांपासून सतत पाठपुरावा केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून राज्यस्तरीय बैठकीत प्रस्ताव  मजूर करण्याचे साकडे घातले होते.

*रामायण कालीन व पुरातन देवस्थान म्हणजे पद्मालय !*

पद्मालय देवस्थान हे रामायण कालीन असून भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये एक आहे. हे देवस्थान  अर्धा पीठ म्हणून सन्मानीत आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहेत. एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या दोघी सोंडेची गणपती मुर्ती विराजीत असून, जगातील हे एकमेव असे मंदिर असून याचे वैशिष्ट्ये म्हणजे   या मंदिराच्या जवळील तलाव कायम कमळाच्या फुलांनी भरलेला असतो. येथील तलावात सप्तरंगी कमळ आहेत. हे मंदिर पुरातन, रामायण कालीन असून मंदिराच्या संपूर्ण बांधकामाची रचना हेमाडपंथी आहे.कोट*श्री. क्षेत्र पद्मालय हे रामायणकालीन  पुरातन व प्राचीन मंदिर असून श्री. क्षेत्र पद्मालय देवस्थान व परिसरातील भीमकुंड हे पर्यटकांचे आकर्षण ठिकाण असून सदर परिसर हा पर्यटन स्थळ म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकस योजनेतर्गत जळगाव जिल्ह्यात श्री गणपती देवस्थान, तरसोद तसेच कण्वऋषी  आश्रम,  कानळदा  येथिल देवस्थानास आपण ब “ वर्ग तीर्थक्षे त्राचा दर्जा मिळवून दिला असून त्याच बरोबर या ठिकाणी प्रत्येकी 6 व 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.  नुकत्याच  प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या राज्यस्तरीय समितीने पद्मालय देवस्थानास “ ब ” वर्ग  तीर्थक्षेत्राचा दर्जा साठी मंजुरी दिली आहे.  त्यामुळे तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक / यात्रेकरु यांना विविध सोयी-सुविधा उपब्ध होणार आहेत. त्यासाठी 5 कोटीचा निधी बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून वनक्षेत्रात पर्यटन स्थळांचा विकास (राज्य योजना)  जळगाव वनविभागा अंतर्गत एरंडोल वनपरिक्षेत्रातील श्री. क्षेत्र पद्मालय परिसरात “पद्मालय वन उद्यान” कामाचा  कृती आराखडा  शासनाच्या वन विभागाकडून लवकरच  मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहे.  पद्मालय देवस्थानास तीर्थक्षेत्राचा  “ ब ” वर्ग दर्जा मिळाला असून आता लक्ष्य “पद्मालय वन उद्यान ” मंजुरीचे असून त्यासाठी लागणार 10  कोटी  93 लक्ष  निधी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आ.चिमणराव पाटील यांचे सहकार्य घेऊन मंजूर करणार आहे.  
*पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील*

कोट*श्री. क्षेत्र पद्मालय हे रामायणकालीन  पुरातन व प्राचीन मंदिर असून श्री. क्षेत्र पद्मालय देवस्थान व परिसरातील भीमकुंड हे पर्यटकांचे आकर्षण ठिकाण असून सदर परिसर हा पर्यटन स्थळ म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकस योजनेतर्गत जळगाव जिल्ह्यात श्री गणपती देवस्थान, तरसोद तसेच कण्वऋषी  आश्रम,  कानळदा  येथिल देवस्थानास आपण ब “ वर्ग तीर्थक्षे त्राचा दर्जा मिळवून दिला असून त्याच बरोबर या ठिकाणी प्रत्येकी 6 व 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.  नुकत्याच  प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या राज्यस्तरीय समितीने पद्मालय देवस्थानास “ ब ” वर्ग  तीर्थक्षेत्राचा दर्जा साठी मंजुरी दिली आहे.  त्यामुळे तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक / यात्रेकरु यांना विविध सोयी-सुविधा उपब्ध होणार आहेत. त्यासाठी 5 कोटीचा निधी बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून वनक्षेत्रात पर्यटन स्थळांचा विकास (राज्य योजना)  जळगाव वनविभागा अंतर्गत एरंडोल वनपरिक्षेत्रातील श्री. क्षेत्र पद्मालय परिसरात “पद्मालय वन उद्यान” कामाचा  कृती आराखडा  शासनाच्या वन विभागाकडून लवकरच  मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहे.  पद्मालय देवस्थानास तीर्थक्षेत्राचा  “ ब ” वर्ग दर्जा मिळाला असून आता लक्ष्य “पद्मालय वन उद्यान ” मंजुरीचे असून त्यासाठी लागणार 10  कोटी  93 लक्ष  निधी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आ.चिमणराव पाटील यांचे सहकार्य घेऊन मंजूर करणार आहे.  
*पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील*

About Author

You may have missed

error: Content is protected !!