बापरे! भरधाव डंपरने इतक्या बकऱ्यांचा जागीच मृत्यू

images-2.jpeg

प्रतिनिधी जळगांव तालुक्यातील चिंचोली या गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल १५ बकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. चिंचोली येथील कैलास लटकन कोळी हे बकऱ्या पालनाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असून त्यांच्याकडे २० ते २२ बकऱ्या आहे. नेहमीप्रमाणे बकऱ्यांना चारण्यासाठी गेले होते. त्यानंतर शेतातुन बकऱ्यांना चारून ते दुपारी १ वाजेच्या सुमारास चिंचोली गावात आले. दरम्यान कैलास कोळी हे बकऱ्यांना महामार्गावरून ओलांडून नेत असतांना जामनेकरकडून जळगावकडे येणाऱ्या भरधाव डंपरने बकऱ्यांना चिरडले. यात एकुण १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत डंपरचालकाला ताब्यात घेतले. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, डंपरचालकाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत सदर मार्गावर अनेकदा आपघटच्या घटना घडल्या आहेत. महामार्ग असल्याने वेगाने वाहने जात असतात. अशावेळी रस्ता ओलांडताना किंवा वाहनामध्ये अपघात झाले आहेत.

About Author

You may have missed

error: Content is protected !!