घरच्या लोकांच्या विरोधात गेली अन् लग्नही केलं, त्यानंतर. धक्कादायक प्रकार
पटना : एका तरूणाने तरुणीसोबत मैत्री झाली होती. फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून या दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाले.त्यानंतर तरूणी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध तरूणाकडे निघून जाण्याचा निर्णय घेतला . त्यानंतर या दोघांनी छपरा येथे कोर्ट मॅरेज केलं आणि मंदिरात जाऊन लग्न केलं. लग्न केल्यानंतर ते दोघेही दिल्लीला गेले. चार महिन्यांनंतर पती गायब झाला. त्यावेळी प्रेयसीनं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन स्विच ऑफ लागला. बिहारमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सौनोली गावात राहणारा अंकित कुमार याची भाकुरा भिटाठी गावात राहणाऱ्या प्रीती कुमारी या तरूणीसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. त्यानंतर हे दोघं मेसेंजरवर चॅटिंग करत होते. मग दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला. यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सॲपवर संभाषण सुरू होते. काही काळानंतर त्या दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.तरूणीनं सांगितलं की, 27 डिसेंबर 2022 रोजी आम्ही कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर काही दिवसांनी मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार आमचं लग्न झालं होतं. लग्नानंतर आम्ही दिल्लीला गेलो. त्यावेळी आम्ही अगदी आनंदात राहत होतो. नंतर, काही दिवसांनी अंकित मला न सांगता गावाकडे पळून गेला. गावाकडे आल्यानंतर त्याने माझा मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला. त्याची वाट पाहून शेवटी मी दिल्लीहून गावाला गेले. तेव्हा अंकितने आणि त्याच्या घरच्यांनी मला घरात येऊ दिले नाही.
दरम्यान, तरूणीनं संपूर्ण घटनेची माहिती देत पतीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना अर्ज दिला. पोलिसांनी अर्जाच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.