प्रेमीयुगुलामध्ये वाद आणि रागाच्या भरात तरुणाने तरुणीचा हात पकडला आणि थेट तलावात उडी मारली..

n4858764281680342839152f24f9d7499684666d9089285a690d557816540e4781178c32ec78ba415f78190.jpg

प्रतिनिधी धुळे- कुटुंबीयांनी लग्नास विरोध केल्यामुळे निराश प्रेमीयुगुलाने शहरालगत नकाणे जवळील तलाव येथे काल सायंकाळी धक्कादायक घटना घडली.प्रेमीयुगुलामध्ये भांडण झालं आणि रागाच्या भरात तरुणाने तरुणीचा हात पकडला आणि थेट तलावात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केली. ही तरुणी काठावरच असल्यामुळे ड्युटीवर असलेल्या गार्डने तिला वाचवलं. परंतु तरुण खोल पाण्यात गेल्याने त्याचा शोध लागलेला नाही.

धुळ्यातील साक्री तालुक्यात वस्तावास कल्याण रामेश्वर पाटील हा तरुण आणि २३ वर्षीय तरुणी काल संध्याकाळी नकाणे तलाव इथे भेटण्यासाठी आले होते. मात्र याठिकाणी प्रेमीयुगुलाचा वाद झाला. त्यानंतर कल्याण पाटील या तरुणाने सोबत असलेल्या तरुणीचा हात धरुन थेट नकाणे तलावात उडी आत्महत्येचा प्रयत्न केला. या दरम्यान संबंधित तरुणी ही काठावरच असल्यामुळे त्या ठिकाणी गार्ड ड्युटीवर असलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान कन्हैया चौधरी यांचं वेळीच लक्ष दिलं. त्यांनी लागलीच आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणीचा जीव वाचवला. मात्र तरुण खोल पाण्यात गेल्याने त्याचा शोध घेता आला नाही.या ठिकाणी काही वेळातच राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि धुळे तालुका पोलिसांनी लागलीच धाव घेत राज्य आपत्ती दलाच्या कर्तव्यदक्ष टीमने या तरुणाचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र हा तरुण त्यांना या ठिकाणी मिळून आला नाही. मात्र या ठिकाणी कन्हैया चौधरी यांच्या कर्तव्यदक्षपणा आणि प्रसंगावधनामुळे संबंधित तरुणीचा जीव वाचला आहे. तिला तिच्या घरच्यांसोबत पाठवण्यात आलं आहे.या घटनेबाबत विचारणा केली असता मुलीने सांगितलं की, “मला या तरुणाशी काहीही संबंध ठेवायचे नव्हते.

त्याच्या मोबाईल फोनमध्ये असलेले माझे फोटो देखील मला डिलीट करायचे होते. यासाठी मी त्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आली होती. मात्र कल्याण पाटीलला ही गोष्ट मान्य नसल्यामुळे त्याने मला जबरदस्तीने तलावाकडे घेऊन गेला आणि तलावात उडी मारली. मात्र मी काही प्रयत्न करुन काठावर आले. त्यावेळेस या ठिकाणी गार्ड ड्युटीवर असलेल्या एका कर्मचाऱ्याने मला बाहेर काढले आणि माझा जीव वाचला

About Author

You may have missed

error: Content is protected !!