संतापजनक! पती बाहेरगावी गेल्याने विवाहित महिलेचा केला विनयभंग; एकाविरूध्द गुन्हा दाखल

images-8.jpeg

विवाहित महिलेचे पती बाहेरगावी गेल्याची संधी साधून पतीच्या ओळखीच्या इसमाने रात्री घरासमोर येवून आवाज दिल्यावर घराचा दरवाजा उघडताच सदर महिलेला तु मला खूप आवडतेस असे म्हणून तीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी दत्तात्रय सुभाष माने (रा.सलगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील पिडीत महिला ही 30 वर्षीय असून तीचे पती व आरोपी हे ओळखीचे असल्याने घरी येणे जाणे होते.

या दरम्यान आरोपी हा पिडीतेकडे नेहमी वाईट नजरेने पहात होता. पिडीतेने ही घटना पतीस व नातेवाईकांना सांगितल्यानंतर आरोपीला समज दिलेली होती.पिडीतेचे पती संशय घेवून भांडणे करून बाहेरगावी कामास गेले होते. याची संधी साधून आरोपी दत्तात्रय माने याने दि.28 मार्च रोजी रात्री 8.30 वा. पिडीता जेवण करून घराचा दरवाजा बंद करून मुले व सासू झोपले होते.

यावेळी आरोपीने घराजवळ येवून आवाज दिल्याने व मोठमोठयाने शिवीगाळ केल्याने दरवाजा उघडला असता पिडीतेचा हात धरून घराच्या बाहेर ओढून अंगाशी झोंबाझोंबी करत तु माझेसोबत का येत नाही,तु मला खूप आवडतेस असे म्हणून ओरडू लागला. त्यावेळी आवाजाने पिडीतेची सासू जागी होवून घराबाहेर आली.व आरोपी पळून जात असताना तु आता सुटली आहे. तुइया मुलांना नंतर बघून घेतो अशी धमकी देवून निघून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!