मुंबईत डान्स बारवर पोलिसांचा छापा; अश्लील नृत्य करत होत्या.
डोबिवली : येथील आर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नृत्य सुरु असलेल्या कशिश लेडीज बारवर कोळसेवाडी पोलिसांनी अचानक धाड टाकली. बारमध्ये तब्बल २८ बारबाला अश्लिल हावभाव करीत नृत्य करत असल्याचे या छाप्या दरम्यान आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.तसेच बार मालक, कर्मचारी व काही ग्राहकांसह २३ जणांविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात असलेल्या कशिश बारमध्ये आर्केस्टा बारमध्ये छमछम सुरु असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख आणि गुन्हे शाखा पथकाचे पोलिस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ३० मार्चला रात्री अचानक बारवर छापा टाकला.
यावेळी एका हिंदी गाण्यावर महिला तोकडे कपडे घालून अश्लिल हावभाव ग्राहकांसमोर करत असल्याचे पोलिसांनी आढळून आले. या छापेमारीत पोलिसांनी २८ बारबालांसह इतरांना ताब्यात घेतले आहे. आर्केस्ट्रा बारमध्ये केवळ ४ गायिकांना ठेवण्याची परवानगी असताना तब्बल २८ महिला बारचालकाने ठेवल्या होत्या.कशिश बारमध्ये बारचे चालक – मालक, कर्मचारी व ग्राहकांकडून त्या बारबालांना अश्लिल नृत्य करण्यास संगनमताने प्रोत्साहित केल्याप्रकरणी तसेच ऑर्केस्ट्रा बारमध्ये नाचण्यास प्रतिबंध असल्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात २८महिलासह बार मालक समेश्वर बहादूर उमाशंकर सिंह, मॅनेजर, वेटर व ग्राहकांसह २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.