बापरे! शिवशाही’ने घेतला पेट; बस जळून खाक, अंगावर काटा आणणारा Video

n486763072168059092432532f08ad366d4fd93c2aac6d74c8063ca90af63a0a8f843a754e1373620fbe87b.jpg

नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरवरून अमरावतीकडे निघालेल्या धावत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. या घटनेत बस जळून खाक झाली आहे.ही बस 16 प्रवासी घेऊन नागपूरवरून अमरावतीकडे चालली होती. कोंढाळी परिसरात असलेल्या साईबाबा मंदिराजवळ अचानक या बसला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, या बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, मात्र आग लागल्यामुळे बसचं मोठं नुकसान झालं आहे. बस जळून खाक झाली आहे.

बसमध्ये 16 प्रवासी घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरमधून ही शिवशाही बस अमरावतीकडे निघाली होती. या बसमधून एकूण 16 प्रवासी प्रवास करत होते. ही बस कोंढाळी परिसरात असलेल्या साईबाब मंदिराजवळ आली असता बसने अचानक पेट घेतला. या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाला.

मात्र प्रसंगावधान राखत प्रवासी खाली उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण धावत्या बसने अचानक पेट घेतल्यानं प्रवाशांमध्ये घबराट पसरली. एकच गोंधळ उडाला. मात्र प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी बसमधून उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र बसचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनं पुन्हा एकदा शिवशाही बसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!