महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करा.सत्यशोधक समाज संघाची मागणी.

IMG-20230406-WA0009.jpg

प्रतिनिधी – एरंडोल येथील सत्यशोधक समाज संघातर्फे सत्यशोधक तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दि.११ एप्रिल रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्या नावे तहसिलदार एरंडोल यांना देण्यात आले.
निवेदनात तात्यासाहेब ज्योतिराव फुले हे आधुनिक भारताचे शिल्पकार असुन त्यांनी स्वतंत्र,समता,मित्रता व न्याय ही मूल्ये संपूर्ण विश्वात रुजवली तसेच त्यांनी सत्य प्रस्थापित करण्यासाठी जीवाची बाजी लावली असल्याचे म्हटले असुन छ्त्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुरु करण्याचा मान तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांनाच जात असल्याचे म्हटले आहे.तसेच महात्मा फुले यांचे गुरु छ्त्रपती शिवाजी महाराज यांची व महात्मा फुले यांना गुरु मानणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शासकीय सुट्टी मंजुर आहे परंतु महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी नाही हा त्यांचा अपमान नाही का ? असा प्रश्न केला आहे.शेवटी सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदन शिवदास महाजन, राजधर महाजन, भरत महाजन,कविराज पाटील,रविंद्र महाजन,वृषभ महाजन,तुषार महाजन,अक्षय महाजन,सुरेश महाजन,अनिल महाजन,राकेश पाटील,राजेंद्र महाजन,कैलास महाजन,कमलेश महाजन आदींच्या हस्ते एरंडोल तहसिल कार्यालयातील अव्वल कारकुन मुकेश जाधव यांनी स्वीकारले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!