एरंडोल येथे महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन.
प्रतिनिधी – एरंडोल येथील सत्यशोधक समाज संघ,जळगाव बिल्डिंग पेंटर असोसिएशन संचालित हिंदु – मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशन तथा महात्मा फुले युवा क्रांती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिर दि.११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत महात्मा ज्योतिराव फुले पुतळा माळी वाडा एरंडोल येथे आयोजित करण्यात आले आहे.शिबिरात जळगाव येथील सिटी हॉस्पिटलचे डॉ. पाराजी बाचेवार यांचे सहकारी तपासणी करुन पुढील निदानासाठी योग्य सहकार्य करणार आहे.तरी परिसरातील नागरिकांनी सदर शिबिराचा मोफत लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.