न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक बक्षीस वितरण
एरंडोल:-येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक बक्षीस वितरण सोहळा पार पडला. शाळेतील नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षभरात घेण्यात आलेल्या निबंध रांगोळी हस्ताक्षर नृत्य विविध खेळ व विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सरला विंचुरकर ह्या होत्या. २०२२/२३ या शैक्षणिक वर्षात दहावीची विद्यार्थिनी राजनंदिनी चौधरी हिने आदर्श विद्यार्थी म्हणून मान पटकावला तिचा विशेष सत्कार प्रमाणपत्र देऊन करण्यात आला
प्रास्ताविक उपप्राचार्य सरिता पाटील यांनी केले, सूत्रसंचालन मयुरी बिर्ला यांनी केले आभार प्रदर्शन सुनील धनगर यांनी केले. याप्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक उपस्थित होते.