महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…

IMG-20230412-WA0178.jpg

प्रतिनिधी एरंडोल – एका स्री चे शिक्षण म्हणजे अवघ्या कुटुंबाचे चे शिक्षण हे ज्यांना कळले असे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती शहरातील विविध सामाजिक संस्था तर्फे विविध उपक्रमाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास सकाळी मान्यवरांच्या हस्ते माल्य अर्पण करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, मुख्याधिकारी विकास नवाळे, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांचेसह विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच महात्मा फुले युवा क्रांती मंचचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि युवकांनी शहरातून भव्य
मोटरसायकल रॅली काढण्यात आली व शहरात जागोजागी प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच महात्मा फुले युवा क्रांती मंच व सत्यशोधक समाज यांच्यातर्फे महात्मा फुले पुतळ्याजवळ आरोग्य शिबिर घेण्यात आले आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला शिबिराचा एकूण 200 जणांनी लाभ घेतला तसेच सायंकाळी प्रमुख मार्गाने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची व सजीव देखाव्याची शोभा यात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेवर ठिकठीकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच मनोज महाजन व प्रतिमा महाजन यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषे साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते शोभायात्राच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.यावेळी उपस्थित कार्यकर्ते जय ज्योती, जय क्रांती अशा घोषणा देत होते. शोभायात्रा शांततेत पार पडून फुले पुतळ्याला सांगता करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रमेश परदेशी, रवींद्र महाजन, राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, निवृत्त तहसीलदार अरुण माळी,युवा उद्योजक समाधान पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय ” महाजन,तालुकाध्यक्ष योगेश महाजन,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन, ज्ञानेश्वर आमले शिवसेनेचे शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत), विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष दुर्गादास महाजन, दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन, शहरप्रमुख प्रमोद महाजन, माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील, अभिजित पाटील, संजय महाजन, पी.जी.चौधरी, आय. जी, माळी, सर माजी उपनगराध्यक्षा आरती महाजन, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, रुपेश माळी, कुणाल महाजन संस्थापक अध्यक्ष कैलास महाजन, डी एस पाटील सर यांचेसह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमासाठी महात्मा फुले युवा मंचच्या पदाधिका-यांनी सहकार्य केले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!