जिल्हा युवा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी जळगाव : जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना युवा विकासाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. यासाठी शासनामार्फत जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना जिल्हा युवा पुरस्कार प्रती वर्षी देण्यात येतो.
जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव मार्फत सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या दोन वर्षाच्या पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्हा युवा पुरस्कार हा जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदर पुरस्काराचे अर्ज विहित नमुन्यात भरून केलेल्या कामाचे योग्य ते सबळ पुरावे (वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्र, चित्रफिती, फोटो इत्यादी) जोडून सादर करावयाचे आहे.
पुरस्कारासाठी प्रस्ताव 28 एप्रिल, 2023 (कार्यालयीन वेळेत) पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, ए विंग, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव , दुरध्वनी क्रमांक – ०२५७-२२३७०८० येथे सादर करावा.
अर्जदार युवक/युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यंत असावे. दोन्ही पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक/युवती व युवा विकासाच्या कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य हे दिनांक 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत लगतपूर्व गत तीन वर्षाची केलेली कामगिरी विचारात घेतली जाईल. जिल्हा युवा पुरस्काराचे विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत जिल्हा कीडा अधिकारी कार्यालय, जळगांव येथे दिनांक १३ ते २८ एप्रिल २०२३ या दरम्यान उपलब्ध होतील. दिलेल्या विहित मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
पुरस्कारासंबंधी अधिक माहिती क्रीडा व युवकसेवा संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळवर उपलब्ध आहे. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक क्र. युवयो-२०१२/प्र.क्र.६५/क्रीयुसे-३ दिनांक १२ नोव्हेंबर, २०१३ यावर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव येथेही उपलब्ध होईल.
सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या दोन वर्षाकरिता दिलेल्या विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने सर्व कागदपत्रांसह सादर करावयाचे असून अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्र इत्यादी पडताळणी करुन पुरस्कारार्थीची अंतिम निवड ही जिल्हा युवा पुरस्कार निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे