जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परिक्षा या रोजी
प्रतिनिधी जळगाव : केंद्र सरकार संचालित जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, भुसावळ जि. जळगाव येथील इयत्ता 6 वीच्या सन 2023-24 प्रवेशाकरीता होणाऱ्या निवडी चाचणीसाठी परिक्षा शनिवार, 29 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11.30 ते 1.30 वाजेपर्यंत नियोजीत केली आहे.
तरी सर्व संबंधीत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अध्यापक, पालक व विद्यार्थांनी याची नोंद घ्यावी. या परिक्षेकरीता जळगाव जिल्ह्यातून 9 हजार 850 विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. या परिक्षेचे प्रवेश पत्र https://cbseitms.rcil.gov.in/nvs या संकेतस्थळावरून डाउनलोड करुन घ्यावेत. अधिक माहितीकरिता ९४२२७९७११०/९५८८४०१४५१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच परीक्षा केन्द्र कमांक 1 वर विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर केन्द्राचे नाव K. Nakakhede असे झाले असुन ते K. Narkhede आहे असे विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. कासार यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.