मानव सेवा बहुउद्देशिय संस्थेतर्फे पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात..!

IMG-20230412-WA0046.jpg

एरंडोल: ‘बहुमान सत्कर्माचा बहुमान सेवाव्रतींचा, या उक्तीप्रमाणे राज्यभरातून विविध क्षेञात नाविन्यपुर्ण बहुमूल्य कामगीरी केल्याबद्दल मानव सेवा बहुउद्देशिय संस्थेतर्फे ५१ स्ञी पूरूष कार्यकर्त्यांना पुरस्कार वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ मोहन बी. शुक्ला हे होते.यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार सुचिता चव्हाण, पोलिस निरीक्षक सतीष गोराडे,प्रशासक विनय नवाळे, बालाजी ट्रस्ट नाशिक च्या अध्यक्षा जयश्री चौधरी,टि.व्ही.मालिका कलावंत विजयमाला चौहान,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,माजी जि.प.सदस्य नानाभाऊ पोपट महाजन,शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते रमेश महाजन,काँग्रेसचे प्रदेश प्रतीनिधी विजय महाजन, उद्योजक अशोक पाटील,ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.कैलास महाजन,उद्योजक नरेंद्रसिंह पाटील,डॉ.फरहाज बोहरी,शालिक गायकवाड,माजी मुख्याध्यापक हरीश्चंद्र चौधरी यांची प्रमुख अतीथी म्हणून उपस्थिती होती.
राज्यभरातून जवळपास ११० प्रस्ताव संस्थेस पुरस्कारासाठी प्राप्त झाले त्यापैकी ५१ कार्यकर्ते पुरस्काराचे मानकरी ठरले.
या सोहळ्याकरीता प्रा.आर.एस.पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन महापुरूषांच्या प्रतीमांचे पुजन करण्यात आले.
आजवर पुण्यामुंबई कडचीच मंडळी व तिकडच्याच सामाजिक संस्थांतर्फे पुरस्कार वितरण करण्यात आले आहे माञ मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष यांनी पुरस्कार वाटपाचा बहुमान खान्देशास प्राप्त करून दिला. विशेष हे की,पुरस्कारार्थींमध्ये मुंबई,पुणे, नाशिक,कोल्हापूर,अमरावती,संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांचा समावेश होता.
सन्मानपञ,स्मृतीचिन्ह,साई शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

मानव सेवा संस्थेचे प्रमुख विकी उर्फ युवराज खोकरे हे अत्यंत कमी वयात संपादक,छायाचिञकार,आरोग्यदूत,रूग्णवाहीकाचालक ते सामाजिक कार्यकर्ते अश्या विविध भूमिका बजावत नावलौकीकास आले. अश्या या विकी यांच्या संस्थेचा पुरस्कार आम्हास मिळाल्यामुळे आम्ही खर्या अर्थाने ‘लकी, ठरलो आहोत अशी भावना पुरस्कारप्राप्त मानकर्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रास्ताविक मानव सेवा बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष विकी खोकरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूञसंचालन वैशाली पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.आर.एस.पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संस्थेचे उपाध्यक्ष विजय पाटील,सचिव फकीरा खोकरे,अरूण माळी,सागर साळी,गौरी मानुधने,मालती पाटील,सुदाम ठाकूर अमीन मुजावर आदींनी परिश्रम घेतले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!