पानटपरी चालकांना ‘चुना’ लावणाऱ्या तोतया पोलिसाला मुंबईत अटक
मुंबईत मागील काही दिवसांपासून पोलीस असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय झालेली आहे.कैलास खामकर (वय – ४५) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक यश पालवे पोलीस व्हॅनद्वारे जात असतानाच आरोपी कैलास चकाला मेट्रो स्थानकाजवळ दुचाकी घेऊन उभे होते. पहिल्या नजरेतच यश यांना त्याच्यावर संशय आला.
आरोपी खाकी कपड्यात होता, परंतु तो वापरत असलेली दुचाकी मात्र ट्राफिक पोलीस वापरतात तशी होती. आरोपीच्या दुचाकीवर ‘पोलीस’ असे स्टीकर लावण्यात आले होते, तसेच यश यांच्या युनिफॉर्मवर असणाऱ्या स्टारपेक्षाही जास्त स्टार आरोपीच्या युनिफॉर्मवर होते.संशय आल्याने यश पालवे यांनी चालकाला पोलीस व्हॅन वळवण्यास सांगितले. व्हॅन आपल्याकडे येताना दिसताच आरोपीची धांदल उडाली, मात्र पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपीला थांबवत त्याच्याकडे विभागाची माहिती विचारत ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. आरोपीला अंतर्गत विभागांची आणि पोलिसांच्या कामाकाजाची माहिती होती. परंतु त्याने दाखवलेल्या ओळखपत्रावर घाटकोपर पोलीस स्थानक असा उल्लेख होता. मात्र मुंबई पोलिसांना वैयक्तीक पोलीस ठाण्यांकडून नाही तर पोलीस आयुक्तालयाकडून ओळखपत्र मिळत असल्याने यश पालवे यांचा संशय आणखी बळकट झाला