एरंडोल येथील महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी अभिवादन..!
एरंडोल: येथील महाविद्यालयात दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.अरविंद बडगुजर,माजी प्राचार्य प्रा.एन.ए. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.एस. पाटील,कुलसचिव वेताळे भाऊसाहेब,ज्येष्ठ प्रा.आत्माराम चिमकर प्रा.के.जे.वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.हेमंत पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष माननीय अमितदादा पाटील यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक सुधारणांची व कार्याची आठवण करून दिली.
कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.नरेंद्र तायडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन केले व सूत्रसंचालन प्रा.नरेंद्र गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय गाढे यांनी केले. तसेच महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.शर्मिला गाडगे मॅडम देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.