पंडित साळींना गुरुवर्य जीवन गौरव पुरस्कार
. एरंडोल येथील साळी समाजाचे अध्यक्ष, जळगाव जिल्हा साळी समाजाचे उपाध्यक्ष ,जागतिक साळी फाउंडेशन चे एरंडोल तालुकाप्रमुख तालुका संपर्कप्रमुख ,निवृत्त सेवा संघ एरंडोल चे अध्यक्ष तथा निवृत्त जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघाचे कोषाध्यक्ष ,जि.प.आदर्श् शिक्षक , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवा निवृत्त मुख्याध्यापक, जिव्हेश्वर समाचार पुणे वाचक प्रतिनिधी ,स्वकुळ समाचार ठाणे प्रतिनिधी, एरंडोल साळी समाज महासभा हितचिंतक श्री. पंडित साळी यांना त्यांच्या जीवनातील पन्नास वर्षातील अति उत्कृष्टशैक्षणिक कार्याबद्दल व साळी समाजाचे महनिय उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल च्या कार्याची दखल घेऊन साळी समाजाचे इंद्रधनुष्य रूपी सप्तरंगी कार्य करणारी “जिव्हेश्वर प्रतिष्ठान “व भगवान “श्री जिव्हेश्वर समाचार पुणे “येथील संस्थेने पंडित साळी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे येथील विणकर सभागृहात दिनांक 16 /4/ 2023 रोजी गुरुवर्य जीवन गौरव सन्मानचिन्ह शाल, श्री फळ, गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान मोठ्या दिमागदार सोहळ्यात पुणे येथे नुकताच संपन्न झाला .
त्यांच्या या गुणगौरवा प्रित्यर्थ अविनाश जी साळी ठाणे मुख्यमंत्रींचे माजी स्वियसहायक, एरंडोल साळी समाज, जळगाव जिल्हा साळी समाज, निवृत्त सेवा संघ एरंडोल, निवृत्ती सेवा संघ जळगाव जिल्हा, विविध पदाधिकारी जागतिक साळी फाउंडेशन चे पदाधिकारी ,त्यांचे स्नेही आप्तेष्ट व हितचिंतकांनी श्री . पंडित साळी यांचे अभिष्टचिंतन करून भावी जीवनात अनंत शुभेच्छा देऊन अभिनंदन केलेले आहे.