डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशिवाय देशाला पर्याय नाही
– समता शिक्षक.प. प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ

IMG-20230417-WA0037.jpg

प्रतिनिधी – एरंडोल
या देशामध्ये अनेक धर्म अस्तित्वात आहेत. हजारो जाती अस्तित्वात आहेत. प्रत्येक जाती-धर्माची संस्कृती वेगळी आहे. अशा भिन्न संस्कृतीचे लोक भारतामध्ये मागील 73 वर्षापासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. दरम्यानच्या काळात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. भारताच्या शेजारील देशांमध्ये प्रचंड यादवी माजली. अशाही परिस्थितीमध्ये भारत मात्र स्थिर राहून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचे सर्वस्वी श्रेय भारतीय संविधानाला जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता केवळ भारतापुरता मर्यादित राहिले नसून त्यांचे कार्य वैश्विक झाले आहे. अन्यायाविरुद्ध प्रतीकाराचे ते प्रतीक झाले आहे. त्यामुळेच अमेरिकेतील मिशिगन आणि कोलेरेडो या राज्यांसह जगातील अनेक देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘समता दिवस’ म्हणून साजरी केली जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हिमालयाच्या उंचीचे उत्तुंग कार्य पाहून विरोधक हतबल झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला बदलवून नवीन संविधान आणण्याचा प्रयत्न केला तर या देशाची एकात्मता संपून देशाचे अस्तित्वच धोक्यात येईल, याची विरोधकांना कल्पना आहे. त्यामुळे भांडवलवादी व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना हवे तसे संविधानातील कलम बदलविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी १४ एप्रिल रोजी एरंडोल एसटी आगारात आयोजित जयंती उत्सव कार्यक्रमात केले. आगारा मार्फत भरत शिरसाठ व प्रा. नरेंद्र गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. प्रा. नरेंद्र गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीचे महत्त्व विस्तृतपणे विशद केले व भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वांनी एक झाले पाहिजे, असे आवाहन केले. सरिता देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वाहतुक निरीक्षक गोविंदा बागुल यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होती. मोठ्या प्रमाणावर आगारातील कर्मचारी सदर सभेला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप भालेराव, भगवान ब्रह्मे, विनोद वानखेडे, सुनील खैरनार, लक्ष्मण नेतकर, विनोद ब्राह्मणे इत्यादींनी परिश्रम घेतले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!