एरंडोल भूमिअभिलेख कार्यालयाचा ऑनलाईन काम पूर्ण असल्याचा अहवाल देऊनही ऑनलाईन पत्रिका मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी.

IMG_20230210_151158.jpg

प्रतिनिधी – एरंडोल भूमिअभिलेख कार्यालया कडून ऑनलाईन मिळकत पत्रिका बाबत चुकीचा अहवाल दिल्याची माहिती समोर आली असुन पत्रिका धारक मात्र ऑनलाईन पत्रिका निघत नसल्याची तक्रार करत आहेत.यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असुन जिल्हा भूमिअभिलेख कार्यालय यांनी दिलेल्या माहिती अधिकारात मात्र एरंडोल तालुक्यातील असंख्य कार्ड धारकांना अजुनही ऑनलाईन पत्रिका मिळत नसल्याची तक्रारी समोर येत आहेत.
दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी की एरंडोल तालुक्यात एकूण १६ गावं असुन यात एकुण १९०५३ मिळकत पत्रिका धारक असुन एडीट सुरु न केलेले ६,एडीट सुरु केलेले २१५,एडीट पुर्ण झालेले १८८३४ ,डिजिटल सही ची संख्या १८८३२,रद्द सही असलेल्यांची संख्या ७९ असुन ई – म्युटेशन साठी उपलब्ध मिळकत पत्रिकांची संख्या १८३८४ अशी आहे.एव्हढ्या मिळकत पत्रिका धारकांचे ऑनलाईन पत्रिका पुर्ण असल्याचा अहवाल एरंडोल भूमिअभिलेख कार्यालयातर्फे जिल्हा भूमिअभिलेख कार्यालय यांना दिला आहे.असे असुन सुद्धा यातील असंख्य कार्ड धारकांचे पत्रिका या ऑनलाईन दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत.दरम्यान शासनाने दि.६ डिसेंबर २०२२ रोजी ऑफलाईन मिळकत पत्रिका बंद झाल्याचा निर्णय दिला आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियानातर्गत भूमिअभिलेख कार्यालय यांना कलम १५५ अन्वये दुरुस्ती करण्यासाठी आदेश दिलेले असतांना देखील सदर मिळकत पत्रिका दुरुस्त करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालाकडून ४ ते ६ महिने लागत असल्याच्या पत्रिका धारकांच्या तक्रारी आहेत.सदर पत्रिका दुरुस्तीसाठी जिल्हा भूमिअभिलेख कार्यालय यांनी दि.२५ मे २०२१ रोजी एरंडोल भूमिअभिलेख कार्यालय यांना दि.३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढीव मुदत दिलेली होती.कारण एरंडोल तालुक्यातील मिळकत पत्रिकांचे दुरुस्त करण्याचे काम पूर्ण न झाल्याने त्यांना दहा दिवसांची वाढीव मुदत दिली होती.तरी सुद्धा सदर काम आजपावेतो पुर्ण झालेले नसल्याचे आढळुन येत आहे.यामुळे पत्रिका धारकांचे अतोनात हाल होत असुन याकडे वरिष्टांनी लवकरात लवकर लक्ष घालुन नागरिकांचा होत असलेला त्रास थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!