धक्कादाय !अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या कामगाराला अटक
प्रतिनिधी पुणे शॉपमध्ये काम करणार्या कामगाराने प्रेमाचे नाटक मालकिणीच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत चंदननगर पोलिसांनी सोहेल ऊर्फ सुरज रमजान शेख (वय २३, रा. वडगाव शेरी) याला अटक केली आहे. याबाबत एका ३५ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद (गु. रजि. नं. १६१/२३) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या शॉपमध्ये कामाला होता.
त्याने फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या मुलीला तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे,
असे म्हणून तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले.
दोन महिन्यांपूर्वी घरात कोणी नसताना त्याने तिला जबरदस्तीने बेडरुममध्ये घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्ती शरीरसंबंध केले.
यातून ती मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.