जळगावात 29 एप्रिलपासून खो खो व हॉकी प्रशिक्षण शिबिर आयोजित
जळगावात 29 एप्रिलपासून खो खो व हॉकी प्रशिक्षण शिबिर आयोजित
प्रतिनिधी जळगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव व जिल्हा खो-खो असोसिएशन व क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात खो खो व हॉकी या खेळाचा प्रचार, प्रसार करणे, खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे तसेच खेळाच्या विविध अत्याधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी उन्हाळी खो-खो व हॉकी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २९ एप्रिल ते ८ मे, २०२३ या कालावधीत सकाळी ६.०० ते ८.०० व सायंकाळी ५.०० ते ७.०० या दोन सत्रात श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे करण्यात आले आहे.
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये खो-खो या खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यांच्यामार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रात खेळाडूंना विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शाळा, विविध क्रीडा संघटना, क्रोडा मंडळ यानी जास्तीत जास्त विद्यार्थी/विद्यार्थ्यांनीना या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याबाबत कळवावे. तसेच प्रशिक्षण केंद्रावर येणा-या विद्यार्थ्यांच्या नावाची यादी, संपर्क क्रमांक व पत्त्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव यांचेकडे पाठवावी. अधिक माहितीसाठी मीनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक, खो-खो) ८६२५९४६७०९ व अरविंद खांडेकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक, हॉकी) ९८२२०९१९४३ यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.