पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जिल्हा दौऱ्यावर
प्रतिनिधी जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शनिवार 29 एप्रिल, 2023 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : शनिवार 29 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव, जि.जळगाव येथूण प्रयाण. सकाळी 9.30 वा. बेळी, निमगाव व नशिराबाद शिवार येथे चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सकाळी 10.30 वा. चिंचोली परिसर येथे चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, जळगाव (अजिंठा) कडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, जळगाव (अजिंठा) येथे आगमन व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार जळगाव येथून शासकीय वाहनाने पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगावकडे प्रयाण, आगमन व राखीव.