राज्यस्तरीय साहित्य संमेलनसाठी
कवी प्रवीण महाजन यांची निवड.
प्रतिनिधी – एरंडोल येथील राष्ट्रीय साहित्य संघाचे संस्थापक, कवी प्रवीण आधार महाजन यांची संभाजी नगर ( औरंगाबाद) येथील साहित्य धारा बहुउद्देशीय संस्थेतर्फे बुध्द जयंती उत्सवानिमित योजीलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून संमेलनाचे आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे प्रा.डॉ. संघर्ष सावळे यांनी निवड केली आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी अमरावतीचे ज्येष्ठ साहित्यिक, आंबेडकरी विचावंत शिवा प्रधान तर उद्घाटक म्हणून मराठी विश्व कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद अहिरे, बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ॲड. विजयकुमार कस्तुरे, ज्येष्ठ साहित्यिक बी. डि.पवार,प्रा.स्नेहल अभ्यंकर,प्रा.डॉ.किर्तीमालिनी जावळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२९एप्रिल२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न होणार आहे. सदर निवडीबद्दल प्रविण महाजन यांचे औदुबर साहित्य संघाचे अध्यक्ष ॲड. मोहन शुक्ला, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा.ना. आंधळे, कवी लेखक विलास मोरे, कवयित्री मंगला रोकडे,निवृत तहसीलदार अरुण माळी, माजी नगरसेवक विजय महाजन, कवयित्री शकुंतला पाटील रोटवदकर आदींनी अभिनंदन केले आहे.