पारोळा बाजार समितीमध्ये सत्तापरिवर्तन .
प्रतिनिधी पारोळा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतली आहे.तब्बल अकरा वर्षांनंतर पारोळा बाजार समितीमध्ये सत्तापरिवर्तन झालं आहे. १८ जागांपैकी १५ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर अवघ्या तीन जागांवर शिवसेनेला समाधान मानावं लागलं आहे. शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झाल आहे.
विजयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.