एरंडोल तालुक्यामध्ये खरीप हंगामात होणार बी टी कपाशी पाकिटाचा व खतांचा मुबलक पुरवठा
एरंडोल प्रतिनिधी –
खरीप हंगामासाठी बी टी संकरित कापसाच्या बीजी 1 वाणांसाठी प्रति पाकीट 635 रुपये तर बीजी 2 वानासाठी 853 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2023 अंतर्गत कापूस बियाण्याचा संभाव्य 28901 हेक्टर क्षेत्रासाठी एक लाख चौरेचाळीहजार पकीटा ची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामध्ये बीजी 2 वाण साठी 143640 पाकीट तर नॉनबीटी वाण साठी 640 पाकीटाची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. कपाशीसाठी पुरेसे बियाणे उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना कमतरता भासणार नाही. निर्धारित दरापेक्षा जास्त दराने खरेदी करू नये, ज्यादा दराने बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास तालुका कृषी अधिकारी एरंडोल किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती एरंडोल यांच्याकडे त्वरित तक्रार करावी असे आवाहन कृषी अधिकारी पंचायत समिती एरंडोल यांनी केले आहे.
एरंडोल तालुक्यात 31 मार्च 2023 रोजी 3776 मेट्रिक टन खत साठा शिल्लक असून खरीप हंगाम सन 2023 साठी 12285 मेट्रिक टन खताचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या खताची टंचाई खरीप हंगामात येणार नाही.
शिल्लक साठा व पुरवठा होणारा साठा मे.टन मध्ये
1.युरिया. शिल्लक साठा 1301 ,. होणारा पुरवठा 5625,
एकूण होणारा उपलब्ध साठा 6926
2.डीएपी शिल्लक साठा 128 ., होणारा पुरवठा 675 .,
एकूण होणारा उपलब्ध साठा 803 .
3.एम ओ.पी
शिल्लक साठा 30 होणारा पुरवठा 1388
एकूण होणारा उपलब्ध साठा 1418 .
4.एनपिके
शिल्लक साठा 1658 ,. होणारा पुरवठा 3026 ,
एकूण होणारा उपलब्ध साठा 4684 .
5. एस एस पी
शिल्लक साठा 659 , होणारा पुरवठा 1575 ,
एकूण होणारा उपलब्ध साठा 2234
एकूण
शिल्लक साठा 3776. होणारा पुरवठा 12285
एकूण होणारा उपलब्ध साठा 15661